नाशिकच्या खळबळजनक बलात्कारप्रकरणात वाघ यांची दखल

नाशिक : शहरात सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाची भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी देखील घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. या घटनेमुळे आधार आश्रमातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने राज्यातील सर्व आधारश्रमांचे ऑडिट व्हावे अशी मागणी (Demand for audit of Aadharshram) त्यांनी केली आहे. आधारश्रमाच्या परवानगीबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना त्यांची ही मागणी महत्वाची मानली जात आहे.

काल नाशिकच्या निवासी वसतिगृह (Residential Hostel) मध्ये राहणाऱ्या आदिवासी शाळकरी मुलीसोबत जे कृत्य झाले, ते अतिशय निंदनीय आहे. वसतिगृहाच्या ३० वर्षीय संचालकानेच हे संतापजनक कृत्य केले (The 30-year-old director committed an outrageous act) आहे. नाशिक शहरातील (in Nashik city) माने नगर परिसरात घडलेल्या या प्रकारावर संताप व्यक्त होत असताना राज्यातील सर्व आधारश्रमांचे ऑडिटची मागणी भाजपने त्या चित्रा वाघ यांच्याकडून करण्यात आली आहे. ही मागणी मान्य होईल असा देखील विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

तीस वर्षेय संचालकाने आधार आश्रमातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिला अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केल्यामुळे चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी काल म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) नराधमा विरोधात पॉक्सो अंतर्गत (Under POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी आश्रमातील इतर १२ मुलींसोबत असा काही प्रकार घडला आहे का याचीही तपासणी सुरू आहे.

द किंग फाऊंडेशन संचालित आधार आश्रमातील (Aadhaar Ashrams run by The King Foundation) हा धक्कादायक प्रकार आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुले मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्यामुळे राज्यभरातील आधार आश्रमातील सुरक्षिततेच्या विषयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आधार तीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाची भांडणाच्या कारणातून एका अल्पवयीन मुलाने गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर किंग फाऊंडेशन संचालित ज्ञानपीठात गुरुकुल आधार आश्रमात बलात्काराचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ही मागणी महत्वाची मानली जात आहे.