गुजरात निवडणुकांमुळे क्रिकेटर जाडेजाच्या घरात जंग

Gujrat Election : निवडणुकांमध्ये एका कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आणि त्यातून एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप देशाने बऱ्याचदा अनुभवले आहेतच. गुजरात निवडणुकीमध्ये देखील असेच चित्र आहे. गुजरातच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या(Gujarat Assembly Elections) पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बाजूने तीव्र स्वरुपात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. दरम्यान चर्चा होत आहे ती म्हणजे क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) बहीणने त्यांची वहिनी रिवाबा जाडेजावर केलेल्या आरोपांची.

रवींद्र जाडेजाची बहिण आणि काँग्रेसच्या उमेदवार नयनाबा यांनी (Ravindra Jadeja’s sister and Congress candidate Nainaba) भाजप उमेदवार असलेल्या त्यांच्या वहिनी रिवाबा जाडेजा यांच्यावर (Rabindra Jadeja’s wife and BJP candidate Rivaba Jadeja) हल्लाबोल केला आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी रिवाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे, असा आरोप नयना यांनी केला आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकांमध्ये कौटुंबिक राजकारण पहायला मिळत आहे.

नणंदचा v/s भावजय


जामनगर उत्तर मतदारसंघात रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील दोन महिला सदस्य समोरासमोर आहेत. त्याची पत्नी आणि बहीण समोरासमोर आल्याने चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान विरोधक म्हणून नयनाबा वहिनी रिवाबा यांच्यावर आरोप करताना म्हणाल्या की, रिवाबा सहानुभूती मिळवण्यासाठी लहान मुलांचा वापर करत आहे. एकप्रकारे याला बालमजुरी म्हणतात. काँग्रेस नेत्या नयनाबा यांनी सांगितले की, काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकोट पश्चिमचा मतदार विभाग असूनही रिवाबा जामनगर उत्तरमध्ये कशी मते मागू शकतात, असा सवाल काँग्रेस नेत्याने केला.

त्यासोबतच रीवाबाच्या निवडणूक फॉर्ममधील अधिकृत नाव रेवा सिंग हरदेव सिंग सोलंकी आहे. याबद्दल बोलताना नयनाबाने म्हणतात, “त्यांनी रवींद्र जाडेजाचे नाव कंसात टाकले आहे आणि जडेजा आडनाव हे फक्त वापरण्यासाठी आहे. लग्नाच्या सहा वर्षात तिला नाव बदलायला वेळ मिळाला नाही.”

गुजरातच्या या निवडणुकांमुळे क्रिकेटर रवींद्र जाडेजा याच्या घरात नणंद विरुध्द भावजय अशी जंग छेडली आहे. या लढतीत नणंद जिंकते की भावजयचे पारडे जड राहणार याकडे लक्ष लागून आहे. आरोप प्रत्यारोप करत कुटुंबातील सदस्यच एकमेकांवर चिखल फेक करत आहे. त्यामुळे आता या चिखलात ‘कमळ’ फुलेल की चिखल फेकणारा ‘हात’ भारी पडेल हे पाहण्यासाठी गुजरातच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा ‘#गुजरात इलेक्शन’कडे लागून आहे.