सलग तीन ते चार दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने आता ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे . नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. त्रंबकेश्वरमध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ झाली आहे. नदीच्या पाणी पातळी देखील वाढ होत असल्याने आता गावात शिरत असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
गावात पाणी शिरल्यामुळे गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे यामुळे आता. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेकांच्या दुकानात पाणी शिरण्याची देखील माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व दूर पावसाने जोडपले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे त्या ठिकाणावरील रस्ते फुल पाण्याखाली गेल्याने बंद करण्यात आले आहे.शहरात पाणी शिरल्याने रस्त्यावर पाणी हे नदी नाल्याप्रमाणे खळखळून वाहत असल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असल्याने या ठिकाणी यंदा देखील भरपूर पाऊस पडत आहे . या मुसळधार पावसाने नद्या खळखळून वाहत असून अनेक धबधबेही पाण्याने भरून कोसळू लागले आहेत. पर्यटनाचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर परिसरात प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे अनेक भाविक येत असतात त्यामुळे या ठिकाणी अनेक लहान मोठे व्यापारी लावत असतात त्यांच्यावरही या पावसामुळे नामुसकी ओढवली गेली आहे.रात्रभर चालू असलेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली असून सकळ पासूनच बाजारपेठेतून पाणी वाहत आहे.