Home » सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक!

सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक!

by नाशिक तक
0 comment

सुप्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. त्यांचा कुटुंबाला आता एखाद्या चमत्काराचीच अपेक्षा आहे. बुधवारी रात्री त्यांना उशिरापर्यंत वारंवार झटके आले डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याचे सीटी स्कॅन केले तेव्हा मेंदूच्या एका भागात सूज दिसून आली आहे. त्यांच्या मेंदूला सूज आल्याने त्यात पाणी आढळले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

राजू यांच्या भावाने सांगितल्या नुसार, बुधवारी संध्याकाळी त्यांचा ताप थोडा कमी झाला होता. मात्र अद्याप व्हेंटिलेटरचा आधार काढण्यात आलेला नाही. राजू यांना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबातील सदस्य कुटुंबातील जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून त्यांना ऐकवत आहेत. याशिवाय गजोधर, संकठाचे किस्सेही त्यांच्या आवाजात त्यांना ऐकवले जात आहेत.

राजूच्या पीआरओने यांनी सांगितले की, ” राजू यांनी नळीवाटे दररोज सुमारे अर्धा लिटर दूध दिले जात आहे. ते प्रत्येक उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. शरीरातील हालचालही सातत्याने वाढत आहेत. ऑक्सिजनचा सपोर्टही १० टक्के राहिला आहे. रक्तदाबही आता सामान्य आहे. फक्त आता ते शुद्धीवर येण्याची वाट बघितली जात आहे.

तर दुसरीकडे राजू श्रीवास्तव बरे व्हावेत म्हणून देवाकडे साकडे घालण्यात येत आहे. ४ दिवसांपूर्वी गायक कैलाश खेर यांनीही २१ गुरुजींना राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मृत्युंजय जप करण्यास सांगितले होते. राजू यांनी लवकर बरे व्हावे व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आता कुटुंबीयसमवेत त्यांचे चाहते देखील मोठ्या प्रमाणावर देवाकडे हाथ जोडून प्रार्थना करत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!