धर्मवीरांचं काय झालं ? शिंदेंच्या वक्तव्यानंतर बॅनर; उलगडा झालाच पाहिजे

ठाणे: शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर आता शिवसेनेमध्ये असलेले अंतर्गत वाद हळूहळू ऊफाळून आले आहेत. चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका होऊ लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी नंतर प्रथमच मुलाखत दिली आणि या मुलाखतीत भाजप सह शिंदे गटावर प्रहार झाल्याचं पाहायला मिळालं . त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यावरून सध्या ठाणे शहरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. धर्मवीरांसोबत नेमक काय झालं याचा उलगडात झाला पाहिजे अशा आशयाचे बॅनर ठाण्यात झळकले आहेत . ठाण्यातील चंदनवाडी भागात हे बॅनर लावल्याचे दिसून आले आहे . या बॅनर मध्ये 26 ऑगस्ट 2001 नक्की आमच्या धर्मवीरांचे काय झालं? घात की अपघात लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडात झालाच पाहिजे असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले असताना नाशिक मधील मालेगाव येथे भर सभेत “धर्मवीरांच्या बाबतीत जे जे काही झालेल आहे. सिनेमाचं फक्त तुम्हाला उदाहरण दिलेले आहे. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे योग्य वेळी नक्की बोलेल “ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत


https://youtu.be/bG1dJrdul78