संजय राऊतांच्या घरी झालेल्या ईडी चौकशीत साडेअकरा लाख रुपये सापडले. त्यानंतर या पैशांसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानुसार दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहिलंय त्यामुळे हे पैसे पक्षाच्या कामासाठीचे असल्याचे तर उरलेले दीड लाख हे घरातील खर्चासाठी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. दरम्यान ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहिलेल्या नोटांबाबत दीपक केसरकर यांनी राऊतांवर मोठा आरोप केला आहे. ‘संजय राऊत अत्यंत हुशार आणि बुद्धिमान माणूस आहे, ते काहीही करू शकतात. त्यामुळे त्यांनी स्वतः या पैशांवर एकनाथ शिंदे यांचं नाव लिहिलेलं असेल. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करण्यासाठी असं लिहिलेलं असेल’, असा गंभीर आरोप केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली. यामध्ये ईडीला राऊतांच्या घरातून तब्बल साडेअकरा लाख रुपयांची रोकड मिळून आली. यापैकी दीड लाख रुपये हे घरातील खर्चासाठी असल्याची माहिती समोर आली होती. तर उर्वरित १० लाख रुपयांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’, असे लिहण्यात आले होते. त्यामुळेच हे पक्षाचे पैसे असल्याचे संजय राऊत यांनी ईडीला सांगितलं. मात्र या पैशांवर ‘एकनाथ शिंदेय’ यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याय. तर दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करत हा एकनाथ शिंदे यांच्याविरोधातला कट असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत ईडी प्रकरण; ‘कोण काय म्हणालं’..!
‘ते मला अटक करणार आहे आणि मी अटक करवून घेणार आहे’, संजय राऊत (ईडी कार्यालयाच्या आवारात असताना).
‘राम मंदिराच्या उभारणीसाठीचे पैसे या माणसाने घरात ठेवले की काय? – संजय शिरसाठ.
‘संजय राऊत हुश्शार माणूस, त्यांनी हे पैसे जाणून-बुजून ठेवले असावे. – केसरकर.
‘हा एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला कट; शिंदेंचा या पैशांशी कोणताही संबंध नाही – केसरकर.
‘खोटी केस तयार करून राऊतांना अटक करण्यात आली’, सुनील राऊत ( संजय राऊत यांचे भाऊ).