रोहित शर्माच्या त्या जुन्या ट्वीटमध्ये काय दडलंय; ट्वीट होतंय व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शुभमन गील याने द्विशतक झळकावत नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान त्याच्या संदर्भात द्विशतक करण्यासाठी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याने शुभमन बद्दल केलेल्या एका ट्वीटची सध्या चर्चा होत आहे आणि हे ट्वीट व्हायरल होत आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारत या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलने दमदार द्विशतक झळकावलं. त्याने १४९ चेंडूत २०८ धावांची खेळी खेळली. दरम्यान २०० ची पारी खेळण्यासाठी प्रसिध्द असलेला आणि “शर्माजी का बेटा” म्हणत चाहत्यांनी कौतुक केलेला खेळाडू रोहित शर्मा याने अडीच वर्षांपूर्वी शुभमन गिल याच्या शुभेच्छांना उत्तर देत त्याला ‘Thanks Future’ अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान रोहितच्या या म्हणण्याला शुभमन याने खर्च सिध्द केले आहे. अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

‘Well no one does pull shots better than the #Hitman Happy Birthday!’ म्हणजे ‘#Hitman पेक्षा चांगले शॉट्स कोणीही काढत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा..!’ यावर प्रतिक्रिया देताना रोहित शर्माने शुभमनला त्याचं भविष्य म्हणून संबोधल अर्थात रोहीतसारखी पारी खेळणारा आणि अडीच वर्षानंतर रोहितचे म्हणणे शुभमनने खरे करून दाखविले. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांकडून रोहितचे हे ट्वीट व्हायरल होत आहे. रोहितने जणू भविष्यवाणीचं केली होती अशी प्रतिक्रिया देखील समोर येत आहे.

या ट्वीटमध्ये शुभमन गिलच्याने जवळपास अडीच वर्षांपूर्वी रोहितला ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यावर रोहितने रिप्लायमध्ये Thanks Future असं लिहिलं होतं. ज्यानंतर आता शुभमननेही रोहितप्रमाणेच द्विशतक ठोकत एका दमदार खेळीचं प्रदर्शन केलं आहे. त्याच्या या खेळीमुळे सर्वजण शुभमनवर कौतुकाचा वर्षाव करत असून रोहितने जणू आधीच शुभमनमधील टॅलेंट ओळखलं होतं असं त्याच्या या ट्वीटवरुन दिसत आहे.