नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नाशिकच्या रिंगणात उतरले. दरम्यान नाशिक दौऱ्यावर संजय राऊत यांनी खेळाच्या मैदानात उतरून क्रिकेट खेळण्याचा देखील आनंद लुटला आहे. क्रिकेट खेळताना आधी संजय राऊत क्लीन बोल्ड झाले नंतर मात्र शानदार चौकार मारला. नाशिकच्या संभाजी स्टेडियममध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम दरम्यान राऊत यांनी हजेरी लावत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे.
नाशिकमधील ठाकरे गटाचे १२ नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतांना ठाकरे गटाचे खासदार शिवसेना संजय राऊत यांनी दौरा नियोजित केला. संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर नाशिकला पहिला दौरा केला. शिंदे गटात ठाकरे गटाचे १२ नगरसेवक जाण्याची चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे संजय राऊत यांचा दौरा जाहीर झाल्याने ठाकरे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. राऊत क्रिकेट खेळात असताना त्याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसूनही आला.
*पहा व्हिडिओ*
१ डिसेंबरला संजय राऊत यांचा नाशिक दौरा जाहीर झाला होता त्याप्रमाणे राऊतांनी काल नाशिकला हजेरी लावली. दरम्यान आज राऊत पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि सायंकाळी मेळावा घेणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यासाठी तयारी सुरू केली असून निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार हजेरी लावणार असल्याचे म्हंटले जात आहे.
राजकीय पिचवर आपल्या धुवाधार भाषण शैलीतून संजय राऊत कायमच चौकार षटकार लावत असतात. शिवसेनेची त्यासोबतच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) खिंड भक्कमपणे लढवताना आपण शिवसेना खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) यांना नेहमी पाहतोच. मात्र महाविकास आघाडीचे ओपनर बॅट्समन राहिलेले हेच संजय राऊत नाशकात थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी शाब्दिक नाही तर क्रिकेटच्या खेळातला चौकार लगावला. यावेळी उपस्थित सर्व पाधाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी क्रिकेटचा तर उपस्थितांनी त्यांच्या बॅटिंगचा आनंद लुटला.
राजकीय फटकेबाजीसाठी ओळखले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरुन फटकेबाजी केली. त्यांच्या या फटकेबाजीचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. क्रिकेट खेळताना आधी संजय राऊत क्लीन बोल्ड झाले नंतर मात्र शानदार चौकार मारला. या व्हिडीओत ते एक चौकार मारताना दिसत आहेत. राऊत आधी एका चेंडूत क्लीन बोल्ड झाले मात्र मैदान कोणतही असो शांत बसतील ते राऊत कसे.? लगेचच त्यांनी दुसऱ्या चेंडू मोठा फटका मारत चौकार लावला. दरम्यान नाशिकमध्ये राऊतांच्या या क्रिकेट खेळाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.