शिवसेना कुणाची ? सुप्रीम कोर्टाची सुनावणी लांबणीवर!

शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत आणि शिवसेना कोणाची? असा सवाल आता उपस्थित झालेला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईच्या मागणीवरून मूळ शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत या सर्व याचिकांवर दोन ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती पण आता ही सुनावणी लांबणीवर गेली आहे .


या दिवशी होणार सुनावणी
सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना विरुद्ध शिंदे गट वादावर याचिका दाखल करण्यात आली आहे या प्रकरणावर सर्व याचिकाकर्त्यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे सुप्रीम कोर्टाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहे. सुरुवातीला दोन ऑगस्ट सुनावणी होणार होती परतू , आता मात्र तीन ऑगस्टच्या संभाव्य यादीमध्ये प्रकरण सूचिबद्ध करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .त्यामुळे ३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड पुकारला या दरम्यान गुहाटीला असताना शिवसेनेकडून शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीस विरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्याप परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे या प्रमुख मागणीसह अनेक गोष्टींना आव्हान देणारी याचिका शिवसेनेने दाखल केली आहे तर अपात्रतेच्या नोटिसीला आणि अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.