संजय राऊतांच्या मीडियाशी बोलण्यावर तुमच्या पोटात का दुखतं? न्यायालयाने पोलिसांना फटकारले

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सध्या न्यायलयीन कोठडीत असून सुनावणी दरम्यान बाहेर आल्यावर ते मीडियाशी संवाद साधतात यावर पोलिसांनी आक्षेप घेतला. मात्र न्यायालयाने पोलिसांनाच झापले असून तुम्हाला काय अडचण आहे असे विचारणा केली आहे. संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असून आज त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होती. मात्र संजय राऊत यांना दिलासा न मिळता त्याच्या जामीन अर्जवरील पुढील सुनावणी आता 2 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत.


संजय राऊत यांच्या जमीन अर्जावरील सुनावणी दरम्यान कोठडीतून बाहेर आल्यावर राज्यातील राजकीय घडमोंडीवर यांच्या प्रतिक्रिया दिल्या देताय. तसेच त्यांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी असून पोलिसांनी संजय राऊत यांना भेटायला येणाऱ्या व्यक्ती आणि मीडियाशी होत असलेला संवाद यावर आक्षेप घेतला आहे. आक्षेपाला सुरक्षेचे कारण देत हा आक्षेप घेण्यात आला आहे.

न्यायालयाने पोलिसांना फटकारले

याबाबत बोलताना न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी म्हंटले की, तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही म्हणता की ही राजकीय केस नाही. मग संजय राऊत बाहेर बोलतात तर प्रश्न काय आहे. राऊत जे बोलतात त्याचा ईडीला काही हरकत नाही. मग पोलिसांना काय प्रॉब्लेम आहे.

न्यायाधीशांनी पुढे म्हंटले की, इथे गोळीबार होणार आहे का? इतर आरोपींना जेव्हा त्यांचे नातेवाईंकांना भेटायला येता तेव्हा यांना काही हरकत नाही. तेव्हा तुम्ही चहा प्यायला देता, डबा खाऊ देता. मग आता का?

मी बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. तुम्ही मला लेखी द्या. कोर्टाच्या बाहेरची गर्दी आम्ही कंट्रोल करणार का? बाहेर लोक भेटतात त्यावरून तुमच्या पोटात दुखायचं कारण नाही, असे न्यायाधीशांनी म्हंटले.