मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकपासून करणार महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात ?

by: ऋतिक गणकवार

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन आखले होते. आणि त्यातच महिना अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात मुख्यमंत्री शिंदे नाशिक पासून करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे नाशिक विभागातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. हा दौरा नाशिकपासून सुरू करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या महिन्याच्या अखेरीस शिंदे नाशिकला येणार आहेत. शिंदे नाशिक विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. सोबतच या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्या मतदारसंघातील कामांचा आढावा देखील घेणार आहेत.


नुकताच आदित्य ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरुंग लागलेल्या भागातील चाचपनी केली आहे. सर्व आपल्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना सेनेसोबत एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे. आदित्य ठाकरेंनी नाशिकमध्ये येऊन शिंदे गटावर जोरदार हल्ला देखील चढविला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाशिक मध्ये आल्यावर काय नवी समीकरणे घडतील याची शक्यता नाही. आदित्य ठाकरे नाशिक मध्ये आले होते तेव्हा शिंदे गटावर सारखे हल्लाबोल करत होते तेव्हा शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी देखील शिंदे गटाची बाजू लावून धरत आदित्य ठाकरे यांना तोडीस तोड उत्तर दिले होते.

या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे नाशिक विभागातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या काळातील जवळपास ६०० कोटींच्या विकासकामांना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थगिती दिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. ते जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहे.