..काय सांगताय काय ?! काही वर्षांमध्ये स्मार्टफोन गायब होणार ?

स्मार्टफोनच्या टेक्नोलॉजीत झपाट्याने विकास होत चालला आहे. ही टेक्नॉलॉजी अगदी वेगाने डेव्हलप होत आहे. काही वर्षात स्मार्टफोनमध्ये आलेला बदल पाहण्यासारखा आहे. आज स्मार्टफोनमध्ये हायटेक कॅमेरा आहे. सॅटेलाइट कनेक्टिविटी आहे. फास्ट चार्जिंगपासून वायरलेस चार्जिंगपर्यंत अविष्कार स्मार्टफोनमध्ये झाले आहेत. प्रत्येक कामात आवश्यक फीचर्सचा समावेश केला जात आहे. हे इथेच थांबणारं नाही तर या टेक्नॉलॉजीत उगवणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात काहीतरी नवेपण आणि ऍडव्हान्स बदल पहायला मिळतच राहतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

टेक्नोलॉजीच्या सेक्टरमध्ये खूप वेगाने विकास होत आहे. स्मार्टफोन कंपन्या लागोपाठ याला आणखी चांगले कसं करता येईल यावर काम करत आहे. स्मार्टफोनवरून तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात स्मार्टफोन इतके हायटेक होतील की ते खिशात नसणार आहेत. कुणाच्याच हातात मोबाइल दिसणार नाही. खरं म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट (Microsoft) चे फाउंडर बिल गेट्स यांनी स्मार्टफोनसाठी एक अशी टेक्नोलॉजी आणण्याचा प्रयत्न केला होता ज्यामुळे स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक टॅटूने स्मार्टफोनला बदलले जावू शकते. म्हणजेच भविष्यात स्मार्टफोनच्या जागी एक इलेक्ट्रॉनिक टॅटूला वापरले जावू शकते. असे असेल स्मार्टफोनचे भविष्य बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनचे भविष्य म्हणजे याला कुणीच खिशात वापरणार नाही. तसेच कुणाच्या हातात सुद्धा स्मार्टफोन दिसणार नाहीत. तर स्मार्टफोन हे आपल्या शरीरात इंटिग्रेट केले जावू शकतील. म्हणजेच स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूजच्या रुपात बदलले जाईल.

बिल गेट्स काय म्हणाले ?

“भविष्यात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदललेला असेल. हा फोन इलेक्ट्रॉनिक टॅटूसारखा असेल. इलेक्ट्रॉनिक टॅटू अगदी लहान चिपसारखे बनतील आणि हे इलेक्ट्रॉनिक टॅटू शरीराच्या आत बसवले जातील.” बिल गेट्स, संस्थापक, मायक्रोसॉफ्ट.

कसे असतील इलेक्ट्रॉनिक टॅटूज

हे इलेक्ट्रॉनिक टॅटूज एक छोट्या आकाराची चिप असेल. ज्याला व्यक्तीच्या शरीरात फिट केले जाईल. नोकियानेही अशाच प्रकारची भविष्यवाणी केली आहे. भविष्यात स्मार्टफोन वर नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्कने सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०३० पर्यंत स्मार्टफोनचा कॉमन इंटरफेसमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळू शकतो. सध्या ६ जी इंटरनेट पर्यंत आपण आलो आहोत. स्मार्टफोनच्या जागी स्मार्ट ग्लास किंवा याच प्रकारचे अन्य दुसरे डिव्हाइसचा वापर केला जाईल. पेक्काच्या माहितीनुसार, २०३० पर्यंत स्मार्टफोनसंबंधित खूप साऱ्या गोष्टी शरीरात थेट इंटिग्रेट केल्या जातील.

यापूर्वी नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही केला होता स्मार्टफोन हद्दपार होणार असल्याचा दावा

“२०३० पर्यंत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होणार आहेत. स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे. सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.” पेक्का लुंडमार्क, सीईओ, नोकिया.