तुरुंगातील हे नेते राज्यसभेसाठी मतदान करणार का ?

मुंबई | राज्यसभेच्या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. सहाव्या जागेसाठी चुरस वाढीला असून त्यात आता सर्वच पक्षांची मताची जुळवा जुळव करण्यासाठी सगळ्यांचीच दमछाक होत आहे महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही अपक्ष्यांवर अवलंबून असताना आता महाविकासआघाडी सरकार मधील तुरुंगात असलेले दोन नेते मतदान करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन नेते सध्या न्यायलयीन कोठडीत असल्याने त्यांना मतदान करता यावाया साठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कोर्टात धाव घेणार असल्याचे सांगत या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावा या साठी योग्य कार्यवाही करणारा असल्याचं म्हटलंय

देशमुख राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यापैकी कोणाचा उमेदवार निवडून येणार, यावरुन सध्या चुरस निर्माण झाली आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यापैकी कोणाकडेही तेवढे संख्याबळ नसल्याने ही निवडणूक अनुज रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सहाव्या जागेसाठी चुरस ; असे आहे मतांचे गणि
शिवसेना 55, राष्ट्रवादी ५४ , काँग्रेस ४४ , इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ १६९ आहे तर भाजपा कडे १०६ आमदार, रासप १ , जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ असे एकूण भाजपकडे ११३ आमदार आहेत राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते
महाविकास आघाडीकडे १६८ आमदार आहेत त्यामुळे संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. त्यानंतर भाजपचे २९ मते उरतात तर सहावी जागा भाजपाला मिळवण्यासाठी आणखी १३ मतांची आवश्यकत असल्याने सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे.

आणखी एका उमेदवाराची निवडणुकीत एन्ट्री करणारा असल्याची चर्चा
राज्यसभेवर आपले उमेदवार निवडून यावे या साठी सर्वच पक्ष कामाला लागले असताना आता उस्मानाबाद येथील राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवायचे ठरवले आहे.अशी चर्चा केली जात आहे त्यासाठी निटूरे हे आज राज्यसभा निवडणुकीसाठी अर्जही दाखल करणार आहेत. एवढंच नव्हे तर आमदारानं टाटा सफारी देण्याचे अमिश दाखवले आहे हि टाटा सफारी आमिष नसून आमदारांनी सहकार्य केल्याने त्यांना मतदार सांगत काम करण्यासाठी भेट देऊ असे सांगितले आहे