पाच कोटी द्या, अन्यथा बलात्काराची तक्रार करणार!

नाशिक । प्रतिनिधी
बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन एका महिलेने पाच कोटींची खंडणी (Five crore ransom) मागितल्याची तक्रार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) केली आहे. त्याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malbar Hill Police Station) खंडणीचा संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार (Rape Case) दाखल करेन अशी धमकी या महिलेने दिली आहे. या महिलेने आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन धनंजय मुंडे यांना फोन करुन धमकी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन या महिलेने मुंडे यांना फोन करत ५ कोटी रुपये किंमतीचे दुकान व महागड्या मोबाइलसाठा तगादा लावला होता. तसंच जर मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मिडियावर (Social Media) बदनामी करण्याची धमकी देत, पून्हा गुन्हा दाखल करण्याची धमकीही महिलेने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.