महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली असून त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांचे महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात राज्यातली कोरोनास्थिती विशद केली आहे. काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आठवड्याला टेस्टचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात घटले, सोबतच कोणत्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे आणि १० टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेट कोणत्या जिल्ह्यात आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्रात माहिती दिली आहे. तसेच राज्याला 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचं देखील आवाहन केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलं आहे.
तसेच आता सन सुरु झाले असून, या सणांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. रुग्णसंख्या जास्त येत असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा, पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग न वाढू देण्यासाठी प्रयत्न करा आणि केस मॅनेजमेंट करण्याचं आवाहन देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी केलं आहे.
काल शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात १ हजार ८६२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, महाराष्ट्रात मागील एका महिन्यात २ हजार १३५ सरासरी रुग्णसंख्या दिवसाला आढळत होते. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या १९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात १९ हजार ४०६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवाी २० हजार ५५१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि ५३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
एकूणच देशासाहित महाराष्ट्राही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आणि आगामी काळात सन-उत्सवाचे दिवस आहेत. गर्दी होईल त्यामुळे काळजी घेतली पाहिजे नाहीतर हे रुग्णसंख्या आणखीनच वाढली जाईल.