Home » देवळालीतील ‘ती’ भरती फक्त रिलेशन संबंधित उमेदवारांसाठी

देवळालीतील ‘ती’ भरती फक्त रिलेशन संबंधित उमेदवारांसाठी

चुकीच्या मॅसेजमुळे हजारो युवकांना मनस्ताप

by नाशिक तक
0 comment

नाशिक । प्रतिनिधी

चार पाच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर देवळालीत लष्कर भरती होत असल्याचा मॅसेज फोनवर खणाणला. अनेक युवकांनी लागलीच आपली गाडी पकडत देवळाली गाठले. अनेकजण महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले तर काहीजण परराज्यातून भरतीसाठी दाखल झाले. मात्र इथे आल्यावर या युवकांना लक्षात आले कि, सोशल मीडियावर चुकीचा मेसेज व्हायरल झाला आणि आपण त्याला बळी पडलो. अफवेवर विश्वास ठेवत देवळाली कॅम्पला पोहचलेल्या हजारो युवकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला.

झाले असे कि, काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर देवळाली येथे लष्कर भरती होणार असल्याचा मॅसेज व्हायरल झाला. अनेकांनी शहनिशा न करता तो फॉरवर्ड केला. यामुळे सदर मॅसेज वाचून भारतीची तयारी करणारे हजारो युवक देशाच्या कानाकोपऱ्यातून देवळाली परिसरात दाखल झाले.

मात्र या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही भरती नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी दाखल झालेल्या तरुणांची पायाखालची जमीनच सरकली. अनेकजण लांबून आल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. महत्वाचे म्हणजे या ठिकाणी फक्त रिलेशन भरती प्रक्रिया सुरू असल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले.

देवळालीत सध्या रिलेशन भरती प्रक्रिया सुरु आहे. मात्र सोशल मीडियावर चुकीचा मॅसेज व्हायरल झाला अन हजारो तरुण या ठिकाणी दाखल झाले. रिलेशन संबंधित नसलेले अनेक तरुणभरती प्रक्रिये साठी दाखल तरुणांचे हाल झाले. राहण्याची आणि जेवण्याची सोय नसल्याने अनेकांनी रेल्वे स्टेशनवरच रात्र काढत माघारी फिरले. यामुळे पुन्हा एकदा चुकीच्या मॅसेज मुळे देशभरातील तरुणांना मनस्ताप सहन करावा लागला.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!