सिल्लोडमध्ये दोन्ही पक्षांचे युवराज आमने-सामने..!

औरंगाबाद : शिवसेनेत (ShivSena) उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात वाद पहायला मिळाला. अशात आता सिल्लोडमध्ये (Sillod, Aurangabad) या दोन्ही गटांची नवी पिढी आमने सामने दिसणार आहेत. सिल्लोडमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) हे दोन तरुण नेते आमने-सामने येणार आहेत. आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे या दोघांचीही ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे.

याआधी सिल्लोड मध्ये होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला सिल्लोड पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. कारण दिवशी सिल्लोडच्या जिल्हा परिषद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील सभा होणार होती. मात्र त्यानंतर आदित्य ठाकरेंना आंबेडकर चौक आणि प्रियदर्शनी चौकाचे पर्याय देण्यात आले. काही वेळाने आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी आंबेडकर चौकाची परवानगी निश्चित करण्यात आली. त्यामुळे आता सिल्लोडमध्ये दोन्ही युवा नेत्यांच्या सभा होणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी सभेमुळे हे दोघे नेते आमने-सामने होतील. विशेष म्हणजे कधीकाळी युवासेनेत दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केले होते.

सोमवारी (दि.७) सिल्लोड शहरातील नगर परिषद प्रशाला मैदानात (Nagar Parishad Prashala ground, Sillod) बाळासाहेबांची शिवसेनेचे नेतृत्व करत खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होईल. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेतृत्व युवानेते आदित्य ठाकरे करतील. दरम्यान दोन्ही पक्षांच्या होणाऱ्या या सभांमुळे दोन्ही पक्षांतील नवी पिढी आमने-सामने येणार आहे.

आदित्य ठाकरेंची शिवसंवाद जाहिरसभा प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक, भोकरदन रोड (Priyadarshini Indira Gandhi Chowk, Bhokardan Road) या ठिकाणी होणार आहे. तर सिल्लोड शहरातील नगर परिषद प्रशाला मैदानात खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा होणार आहे. दरम्यान या सभांतून दोन्ही पक्षाच्या युवराजांमध्ये युद्ध रंगेल का याकडे लक्ष लागून आहे.