Home » सुरगाणा तालुक्यात जि.प गट व पंचायत समिती गणांची सोडत जाहीर

सुरगाणा तालुक्यात जि.प गट व पंचायत समिती गणांची सोडत जाहीर

by नाशिक तक
0 comment

नाशिक: जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. इच्छुकांकडून आरक्षण सोडतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सर्वांच्या नजरा या आरक्षण सोडतीवर होत्या. अशात अखेर आज ही आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात देखील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे सोडत जाहीर झालीये. या वेळेला सुरगाणा तालुका जिल्हा परिषेदेच्या जागांचे आरक्षण सर्वसाधारणसाठी सुटली आहे.

सुरगाणा पंचायत समिती गणांचे आरक्षण खालील प्रमाणे:

५१-गोंदूने गण:-अनुसूचित जमाती स्त्री
५२-काठीपाडा गण:-अनुसूचित जमाती- स्त्री
५३-भदर:-अनुसूचित जमाती स्त्री
५४-हट्टी:-अनुसूचित जमाती स्त्री
५५-बोरगाव अनुसूचित जमाती
५६-मनखेड-अनुसूचित जमाती
५७-पळसन:-अनुसूचित जमाती

जिल्हा परिषदेचे आरक्षण खालील प्रमाणे

२६-गोंदूने गट – सर्वसाधारण
२७-भदर गट – सर्वसाधारण
२८-बोरगाव – सर्वसाधारण-स्त्री
२९-भावाडा – सर्वसाधारण
आशा पद्धतीने हे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.

नाशिक जिल्हा परिषद आरक्षण

नाशिक जिल्ह्यात नव्या रचनेनुसार एकूण ८४ गट आहेत. यात सहा गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. त्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने तीन गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. ३३ गट अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे.

३३ गटांपैकी १२ गट याआधी महिलांसाठी आरक्षित असल्याने ते गट वगळण्यात आले आहेत. तर उरलेल्या २१ पैकी १७ गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आलेय. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण ५ गट होते. मात्र, ३ गट आरक्षित करायचे असल्याने, चिठ्ठी काढून ३ गट आरक्षित करण्यात आले. त्यातील ५० टक्के महिलांसाठी आरक्षण असल्याने, ३ पैकी २ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आले.

सर्व साधारण गटातील ४२ पैकी २० जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. या ४२ पैकी २४ गटांना आतापर्यंत महिला आरक्षण नव्हते. त्यामुळे या २४ गटांमधून २० गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. या आरक्षण यादीवर उद्यापासून २ ऑगस्ट पर्यंत हरकती दाखल करता येतील. या हरकतींची पडताळणी करून ५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!