नाशिक | जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरुन संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर उपअभियंता दीड लाखांची लाच घेताना ऍन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिकच्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे ग्रामीण उपअभियंता लाचखोर अमोल घुगे याला कामाची टक्केवारी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने आणि उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना अँटी करप्शन विभागाने पकडल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी देखील नाशिक जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांनी शिक्षकांच्या वेतनाच्या नियमित मान्यतेसाठी आठ लाख रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेत तीच पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले आहे . अधिकारीदर्जाच्या ग्रामीण उपअभियंता असलेल्या अमोल घुगे ला कामाची टक्केवारी घेताना अटक करण्यात आली आहे .