एकाच दिवसात ११७ जनावरांच्या मृत्यूची नोंद

BY-Revati Walzade

नाशिक- पशुपालन हे मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पादांचे साधन आहे. मात्र त्यावर सध्या लम्पी नावाच्या रोगामुळे रोख लागलाय. देशात अनेक ठिकाणी लम्पिची मोठ्या प्रमाणावर जनावरांना लागण झालीये. अश्यातच नाशिक जिल्ह्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. नाशिक विभागात एकूण दोन हजार दोनशे चौरह्यातर(२२७४) गाव आहेत. नाशिक विभागात गेल्या काही दिवसात एक हजार दोनशे आठावन्न (१२५८) जनावरे लम्पी रोगाने बाधित झालेली आहे.

पशुवैदाकीय विभागाकडून जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजून तरी त्याला पूर्ण पणे यश आलेले नाही म्हणून लम्पी ची लागण अजूनही जनावरांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. नाशिक विभागात दोन हजार दोनशे चौरह्यातर (२२७४)गावांमध्ये या रोगाची लागण जनावरांना झालेली असून त्यामध्ये सर्वाधिक जनावारंची संख्या ही अहमदनगर जिल्ह्यात आहे तर त्या खालोखालच जळगाव जिल्हा आहे.

या रोगामुळे जनावरांचा मोठ्ठ्या प्रमाणावर दुर्दैवीमृत्यू ही होत आहे. विभागात आत्तापर्यंत चारहजार आठशे अठ्ठेचाळीस (४८४८) जनावरांचा मृत्यू झाला असून बुधवारी एकाच दिवशी ११७ जनावारंचा मृतू झाला आहे. गोवंश व म्हैस वर्गातील जनावारणा लम्पी हा आजार होत असून, शेळी, मेंढी यांना या आजाराची लागण होत नाही. याशिवाय देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरांना हा आजार लवकर होण्याचा धोका अधिक असतो. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक विभागात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये अधिक वाढला आहे. यावर उपाय म्हणून पशुवैदकीय विभागाकडून लसीकरण मोहिमेवर अधिक भर देण्यास सुरुवार केली आहे.

बळीराजाच्या वाटेला नेहमीच नुकसान येते, अश्या परीस्थित जनावरांचे मृत्यू होत असल्याने शेतकरी अजूनच अडचणीत आलाय. या मुळे शासनाकडून ज्या मालकांची जनावरे लम्पी आजाराने दगावले आहे त्यांना आर्थिक मदत करण्यात येत असून, आतापर्यंत विभागात २१७९ जनावरांच्या मालकांना पाच कोटी ६५ लाख ७३ हजार रुपये इतकी मदत करण्यात आली आहे. दुभत्या जनावरांसाठी ३० हजार रुपये कष्टाचे कामे करणाऱ्या जनावरांसाठी २५ हजार रुपये आणि लहान वासरांसाठी १६ हजार रुपये या प्रमाणे नुकसानभारापाई दिली जाते.

जिल्ह्यप्रमाणे बाधित जनावरांची संख्या

नाशिक -१३

धुळे- १०

नंदुरबार-५३

जळगाव-१२६

अहमदनगर-१०५६