प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित रविवारी नाशकात काँग्रेस चा मेळावा.

नाशिक:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा निहाय आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नेतृत्वाखाली विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रभारी आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जयशंकर बॅव्वेट हॉल तपोवन रोड शंकरनगर येथे. होणाऱ्या या मेळाव्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत २०२४ च्या अनुषंगाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम व जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीच्या ठरावावर चर्चा होणार आहे.

या मेळाव्याच्या तयारीसाठी कमिटी सचिव आणि जिल्हा निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यांनी चव्हाण यांनी सांगितले की, मेळाव्यासाठी आमदार कुणाल पाटील आमदार के. सी. पाडवी महिला अध्यक्ष संध्या सव्वा राखी आमदार जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे हे देखील उपस्थित राहणार आहे.

सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. नाशिक ग्रामीण, अहमदनगर शहर, नंदुरबार त्यानंतर दुपारी दोन वाजता जळगाव शहर व ग्रामीण आणि दुपारी चार वाजेपर्यंत धुळे शहर व धुळे ग्रामीण आणि सायंकाळी पाच वाजता मालेगाव शहर असे नियोजन करण्यात आले आहे. नियोजन बैठकीत प्रभारी शहराध्यक्ष आकाश छाजेड प्रदेश सचिव रमेश कहांडोळे भास्कर गुंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे, समीर देशमुख, प्रशांत बाविस्कर, प्रकाश पिंपळ उपस्थित होते.