मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला रवाना

दिल्ली:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah)यांच्या उपस्थितीत आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे राज्यांतील दहशतवादविरोधी परिसंवादाचे करण्यात आले आहे. पालकमंत्री पदाच्या यादीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज माओवाद्यांच्या कारवायांचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहे. मात्र या बैठकीच्या एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी पालकमंत्री पदाची यादी निश्चितच करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने आता राज्याच्या राजकारणात आणखी काही भूकंप होणार का? याची शक्यता नाकारता येत नाही.

विज्ञान भवन(Science Building Delhi)येथे बैठकीस जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Ekanath Shinnde) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नक्षलवाद (Naxalism)पूर्णपणे संपला पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. उर्वरित मुद्दे या बैठकीत मांडून बाकीचे राज्य आणि केंद्रासारकरचे जे मदत आवश्यक आहे त्याबद्दल चर्चा होईल.

गोरेगाव मध्ये जयभवानी इमारतीला आग(Fire at Jaibhavani building in Goregaon) लागली आहे मी सातत्याने महापालिका आयुक्त, पोलिस आधिकारी यांच्या संपर्कात आहे. प्राथमिक माहिती आहे की या इमारतीच्या खाली कागदी गटतहे होते त्यामुळे यंग लागली आहे. झालेली घटना आत्यंत दुर्दैवी आहे. मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत शासनाकडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जखमीनवरील खर्च राज्यशासन करणार आसल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे.