४ अल्पवयीन मुलांनी १४ वार करत एकाची निर्घृण हत्या केली..

अल्पवयीन मुल नशा करत असताना त्यांच्यातीलच एकासोबत वाद झाला, याचा राग मनात ठेवत ४ अल्पवयीन मुलांनी एकाला कोयत्याचे १४ वार करत मृत्युमुखी पाडले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ४ ) मुंबईतील मानखुर्द परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत मुलाचे वय अवघे १६ वर्षांचे होते. व त्याचे मारेकरीही त्याच वयोगटातील आहेत. याप्रकरणी प्रकरणी मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत चारही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून त्याची आई दुबईमध्ये काम करते आणि वडील मुंबईत राहतात. मृत मुलगा मानखुर्दमध्ये आपल्या आजोंबासोबत राहत होता. या मुलाला नशा करण्याची सवय लागली होती. दरम्यान, ही सर्व अल्पवयीन मुले नशा करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाला होता. त्याच वादातून परवा संध्याकाळी चार जणांनी 16 वर्षीय मुलाची हत्या करण्याचे ठरवले. सर्व जण एकत्र बसलेले असताना चार मुलांनी कोयता आणि चाकूच्या साहाय्याने मित्राची हत्या केली. आरोपी अल्पवयीन मुलांनी मृत मुलाच्या शरीरावर 14 ठिकाणी वार केले. यातच या मुलाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत चारही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. मात्र अल्पवयीन मुलांनी असे कृत्य केल्याने मुंबई हादरली आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी जगत वाढत चालले आहे.