राजू शेट्टी सरकारवर बरसले; म्हणाले, हे सरकार हार-तुरे…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली असून विरोधकांनाही सुनावले आहे. हे सरकार हार-तुरे आणि उत्सवांमध्ये व्यस्थ आहे. त्यांना सामान्य, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही. त्यात आता विरोधकही काही बोलत नाहीत, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच विरोधकही काहीच बोलत नाहीत असेही ते म्हणाले आहेत. परभणीत काढलेल्या मोर्चात ते बोलत होते, शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरले असून त्यांनी अनेक आस्वा केले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शहरातील संत तुकाराम महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार जनतेचे नाही. सामान्यांना मदत होत नसेल, तर हे सरकार काय कामाचे, असा सवालही त्यांनी केला आहे.

मदतीच्या बाबतीत सरकार दुजाभाव करते राजू शेट्टी यांचा आरोप

राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र अशा नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकारकडून दुजाभाव केला जात आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार आहे, त्या ठिकाणी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या ठिकाणी भरघोस मदत देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकार दुजाभाव करत आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.