मोठी बातमी..! लम्पीमुळे जनावरांना देखील करणार क्वारंटाईन

लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. लम्पी स्कीन रोग हा संसर्गजन्य आहे त्यामुळे आता जनावरांना देखील दो गज दुरी हे जरुरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मृत जनावरांचा मोबदला

लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात बळीराजाला दिलासा मिळत आहे.

पशुसंवर्धन मंत्री म्हणतात

लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रूपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लंपी चर्म आजाराबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, असेही विखे पाटील यांनी सांगितले आहे.

टास्क फोर्स

राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे.  लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे. त्यामुळे राज्यात वाढत असलेला लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदद होणार आहे.