मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा!

शिवसेनेतल्या बंडानंतर राज्यात दोन शिवसेनेने जन्म घेतला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरी शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना एक सेना सत्तेत तर एक विरोधात असून सत्तेतील सेनेचा जोरदार प्रचार प्रसार सुरु आहे. त्यात आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर नाशिकमध्ये पक्षाचे पहिले कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याचे जोरदार उद्घाटन होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे पत्रिका जाहीर झाल्या असल्यातरी अद्याप मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्या नाशकात येतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते शिंदे गटाच्या मुंबई बाहेरील पहिल्या वहिल्या कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. हे कार्यालय पाहिले तर प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि वाघाचे चित्र लावण्यात आलेले आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे आणि शिंदे गटाचं हे पहिले संपर्क कार्यालय आहे, ज्याची बांधणी नाशिक मध्ये झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.


खासदार हेमंत गोडसे कार्यालयाला लागून शाखा

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यालयाला लागूनच ही शिंदे गटची शाखा आहे. शिंदे गटाच्या नाशिक कार्यालयात संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख त्याचबरोबर महानगर प्रमुख यांचे कार्यालय आहेत. इथूनच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारभार हा चालणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते नाशकातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. नाशिक शहरात शिंदे गटाला आणखी बुस्ट मिळण्याची शक्यता आहे.