मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा समर्थक घेऊन चालले गुवाहाटीला..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीच्या सहलीवर चालले असून कामाख्या देवीच्या दर्शन आणि त्यांच्या हस्ते विशेष पुजेच नियोजन देखील यात आखण्यात आले आहे. त्यात त्यांच्या सोबतीला ४० आमदार देखील असणार आहे. २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती काही खात्रीशीर वृत्त पोर्टलच्या वृत्तानुसार माहिती समोर आली आहे. ही विशेष घडामोड मानली जात असून हा एकदिवसीय दौरा आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्याच्या आधी आपल्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीतच ठाण मांडून होते. तेथूनच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व सत्तेची सूत्रे हलवल्याचे कळते. त्यामुळे शिंदे यांच्यामुळे गुवाहाटी महाराष्ट्रात चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते. 

हा एक दिवसीय दौरा आहे. दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत असल्याचे बोलले जात आहे. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांची देखील ते भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे. त्यांचा अ दौरा विशेष असून अनेक घडमोडी घडण्याची चर्चा आहे.