ज्या ताटात खाल्ल त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र; पक्षातील बंडखोरीवर गुलाबराव पाटील म्हणाले..

ज्या ताटात खाल्ल त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार आहे. राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला त्यावेळी ३२ जण आधीच निघून गेल होते, आपण चाळीस पैकी तेहतीसवे शिंदे गटात सहभागी झालो होतो. जाताना आपण त्यांना सांगून आलो होतो, आपण भगोडे नाही असे खडेबोल ठाकरे गटाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुनावले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे देखील त्यांनी का टोचले आहेत. ते जळगावमध्ये एक कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

शिंदे गट- ठाकरे गटात एकमेकांवर कुरघोडी सुरुच असून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सनसनाटी आरोप करत आहेत. त्यातच आता विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली आहे. तसेच राज्यात ठाकरे गट-शिंदे गट एकमेकांवर चिखलफेक करत असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील मैदानावर गुजर समाज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील हे मनोगत व्यक्त करत असतांना बोलत होते. पाटील म्हणाले, ज्या ताटात खाल्ल त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार असल्याचा कडक इशारा ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे.

ढे बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला त्यावेळी ३२ जण आधीच निघून गेल होते, आपण चाळीस पैकी तेहतीसवे शिंदे गटात सहभागी झालो होतो. जाताना आपण त्यांना सांगून आलो होतो,आपण भगोडे नाही. असेही देखील मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

राजकारणात जे घडतं होते त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, चूक सुधारून पुन्हा आमदार आपल्या बाजूला करण्यात यश मिळवता आले असते. मात्र या या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, त्याचाच हा परिणाम आहे. असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुनावले आहे.