त्यांना जमलं नाही, ते आम्ही नक्की करू; संजय राऊतांचा जम्मूतून हुंकार

त्यांना जमलं नाही, ते आम्ही नक्की करू असा निर्धार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी यातून शिंदे गट आणि भाजपवर टोला लगावला आहे. संजय राऊत जम्मूच्या दौऱ्यावर आले आहेत. जम्मूत ते काश्मिरी विस्थापित पंडितांना भेटणार असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये ते सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांनी जम्मूतून एल्गार केला असून विमानतळावर संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या जम्मू दौऱ्यावर आले आहेत. संजय राऊत यांच्या या दौऱ्यात विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून यामध्ये जम्मूत ते काश्मिरी विस्थापित पंडितांना भेटणार आहेत. तसेच ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. विमानतळावर संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंजाब आणि जम्मू काश्मीरचे शिवसैनिक संजय राऊत यांच्या स्वागतासाठी आले होते.

संजय राऊत यांनी यावेळी माध्यमांशी सवांद साधला आहे. यावेळी त्यांना शिंदे गटातील मंत्र्यांनी राऊत यांना तिकडून तसेच पाकिस्तानात जावे अशी टीका केल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, हो आम्हाला पाकिस्तान घ्यायचाच आहे. त्यांना जमलं नाही, ते आम्ही नक्की करू, पाकिस्तान ताब्यात घेण्याविषयी ते बोलत असतील, तर तोच कार्यक्रम असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, या दौऱ्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुठपर्यंत पसरले आहेत हे दिसत असल्याचं संजय राऊत म्हणाले.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष अजूनही महाराष्ट्राच्या बाहेर काम करतो. फक्त आमचा संवाद तुटलेला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.