नाशिकच्या तरुणांना जडतय ई-सिगारेटचे व्यसन

नाशिक : तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले असून महाविद्यालयीन तरुण-तरुणी व्यसनाच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यान आताच्या तरुण वर्गाला ई-सिगारेट हे नवे व्यसन जडले आहे. सिगारेटपेक्षा कमी धोकादायक असलेल्या ई-सिगारेटकडे तरुण वर्गाचा कल वाढत आहे. तरुणांमधील व्यसनाचे हे प्रमाण पाहता नाशिक पोलिसांनी कारवाईची बडगा उगारला असता तब्बल ८८ हजारांची ई-सिगारेट जप्त करण्यात आली आहे.

नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात नाशिक पोलिसांनी कारवाई केली असता. या ठिकाणी पोलिसांना तब्बल ८८ हजारांच्या ई सिगारेट जप्त करण्यात यश आले आहे. पोलिसांची ही कारवाई बघता नाशिकमध्ये ई सिगारेटची अवैधपणे मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे.

नाशिक शहरात ई-सिगारेट कडे तरुण मुलामुलींचा कल वाढत चालला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ई सिगारेट विरोधी कारवाईला सुरुवात केली आहे. शहर आणि परिसरात अमली पदार्थांची अवैधपणे विक्रीचे अनेक डाव पोलिसांनी उधळून लावले आहेत. दरम्यान आता पोलिसांचा ताफा ई सिगारेटकडे वळाला असून यातही पोलिसांनी सापळा रचत कॉलेज रोड परिसरातदोन संशयितांसह ८८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या ९ निकोटिन युक्त ई सिगारेटच्या बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये वेगवेगळया फ्लेवरचे प्रतिबंधित असलेले ८० नग निकोटिनयुक्त ई सिगारेट किंमत रुपये ८७ हजार ९०० रुपये किंमतीचे बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास सुरु आहेत.

शरीरासाठी धोकादायक असल्यामुळे अमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता युवा वर्ग नव्या व्यसनाकडे वळत आहे. ई सिगारेटचे तरुणांना वेड लागले आहे. या सिगारेटचा दूर होत नाही. तंबाखू ऐवजी या सिगारेट मध्ये द्रवरूपी निकोटीनचे कार्तेज उपलब्ध असतात. ती पेटवण्यासाठी काडीपेटी किंवा लाईटरची गरज नसते. यात लहान बॅटरी असते. सिगारेट ओढण्याची प्रक्रिया सुरु झाली की या बॅटरीच्या सहाय्याने ही सिगारेट पेट घेते. यात अनेक वेगवेगळे फ्लेवर असतात आणि स्वस्त असल्यामुळे खिशाला देखील परवडणारी असते. अश्या एक ना अनेक कारणांमुळे ही सिगारेट युवकांची आवडती ठरत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये ही सिगारेट व्यसन वाढत आहे. ही सिगारेट हार्ट, लिव्हर, किडनी आणि फुफ्फुस यासाठी धोकादायक आहे.