काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या; कोण रोहित पवार?, त्यांच्यात पोरकटपणा..

मविआतील घटक पक्षाच्या नेत्यांमध्येच आता खटके उडायला सुरुवात झाली आहे. आधी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये खटके उडाले. आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्यात देखील खटके उडाल्याचे चित्र आहे. ‘कोण राहित पवार?, रोहित पवारांची ही पहिलीच टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल असे म्हणत काँग्रेसच्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. येथे भरलेल्या शेतकरी मेळाव्याच्या वेळी रोहित पवार यांनी हे विधान केले होते. ते म्हणाले, सोलापूरला काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करु’ असे रोहित पवार ,म्हणाले होते. यावरून त्यांनी एकप्रकारे तेथील आमदार प्रणिता शिंदे यांना डिवचलेच होते. त्यावर आता प्रणिता शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर घणाघात केला आहे.

सोलापूर लोकसभेसंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, कोण रोहित पवार? म्हणत त्यांच्या वक्तव्याला किंमत न देण्याचा प्रयत्न केला. आमदारकीची त्यांची ही पहिलीच टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, अश्या कडक शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्या त्या विधानावर उत्तर दिले आहे.

त्यामुळे आता त्याच्यात वाद वाढण्याची शक्यता असून आधी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये खटके उडाले. आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्यात देखील खटके उडाल्याचे चित्र आहे.