आदित्य ठाकरे आमदार कसे झाले; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट!

युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार कसे झाले याचा गौप्यस्फोट शिंदे गट नेते रामदास कदम यांनी केला आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी दोघांना विधान परिषदेच्या जागा द्यावा लागल्या. माझी विधान परिषदही आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दिली. त्यानंतरच ते निवडून आले असे विधान रामदास कदम यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. रामदास कदम खेड येथे बोलत होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी या मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. आणि त्यांचा तिथे दणदणीत विजयही झाला होता. मात्र यासाठी पडद्यामागे काय झाले याचा गौप्यस्फोट शिंदे गट नेते रामदास कदम यांनी केला आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी दोघांना विधान परिषदेच्या जागा द्यावा लागल्या. माझी विधान परिषदही आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दिली, असे रामदास कदम म्हणाले आहेत.

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी काय केले त्यांना माहितीये का? तर वरळी विधानसभेच्या एका जागेसाठी त्या मतदारसंघात दोघांना विधान परिषद द्यावी लागली. माझीही विधान परिषद आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात दिली. त्यानंतरच ते निवडून आले, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

गेले काही दिवस ठाकरे बाप-बेटे यांनी एकच धडाका लावला आहे. तो म्हणजे खोटे बोल, पण रेटून बोल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचे आरोप करत आहेत. मात्र, शिंदेंमकडून आमदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी खोके भरून निधी दिला जातोय, तो मविआच्या काळात दिला जात नव्हता. असा घणाघात त्यांनी ठाकरेंवर केला आहे.