‘राऊत साहेबांची खूप काळजी वाटते, ते..’ राऊतांच्या आरोपानंतर श्रीकांत शिंदेंचे विधान

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यांना जीवे मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे देखील त्यांनी म्हंटले. या प्रकरणावर श्रीकांत शिंदे यांनी अखेर आपली चुप्पी तोडली आहे (Srikanth Shinde on Sanjay Raut). संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर श्रीकांत शिंदे यांनी चांगलाच टोला लागावा आहे. संजय राऊत आणि त्यांच्या वागण्याकडे पाहून त्यांना सिझोफ्रेनिया सारखा आजार त्यांना होतोय की काय? असे वाटत असल्याचे शिंदे म्हणाले.

‘श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला मला जीवे मारण्याची सुपारी दिली’ असून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी देखील भीती राऊतांनी व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना, एक ठाणे पोलीस आयुक्तांना तर एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये उघड उघड श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

त्यांच्या या आरोपावर श्रीकांत शिंदे बोलले आहेत. मी एक डॉक्टर आहे. संजय राऊत आणि त्यांच्या वागण्याकडे पाहून त्यांना सिझोफ्रेनिया सारखा आजार त्यांना होतोय की काय? असे वाटत आहे. माझ्यावरील हा आरोप हास्यास्पद आहे. मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटत आहे आंनी त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे. रोज सकाळी उठून कुणावरही ते आरोप करतात. काल्पनिक, आभासी विश्वात ते राहत आहे. संजय राऊत रोज सकाळी उठून महाराष्ट्राची करमणूक करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा खोचल टोला यावेळी श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहे. तर राऊतांनी केलेल्या या आरोपामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांनी राऊत यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.

राउतांनी पोलिसांवरही केला आरोप

जीवाला धोका असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राऊत पुन्हा एक मोठा आरोप करत आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोप करत या प्रकरणी जे साक्षीदार आहेत, त्यांना पोलीस दबावाखाली आणत असल्याचे म्हंटले आहे. ‘माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती मी दिली असताना, या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याचं काम पोलिस करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.