तब्बल ३९ वर्षानंतर पुन्हा त्याच गावात होणार कांदा परिषद

नाशिक | नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई येथे तब्बल ३९ वर्षानंतर म्हणजेच १९८२ नंतर भव्य कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३९ वर्ष्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या सुटत नसल्याने ज्या गावात दिवंगत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी राज्यातील पहिली कांदा परिषद घेतली होती त्याच नाशिक जिल्ह्यतील निफाड तालुक्याच्या रुई या गावात रयत क्रांती संघटनेकडून ५ जून रोजी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कांद्याला अनुदान मिळावा, योग्य हमीभाव मिळावा,तसेच नाफेड कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा या सह अन्य प्रमुख मागण्यासाठी कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणत घसरत आहेत.त्याबरोबरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी संकटाना सामोरे जावा लागत असल्याने शेतकऱ्यांची अधिकच दुरवस्था झाली आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आंदोलने करून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने या कांदा परिषदेच्या माध्यमातून हाताळण्याची तयारी आता रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे .दरम्यान रुई येथे होणाऱ्या कांदा परिषदेला रयत क्रांती संघटनेच्या नेत्यांसोबतच भाजपाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत . विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ,रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, भाजपनेते किरीट सोम्या ,गोपपीचंद पडळकर यांच्या सह इतर नेते उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दीपक पगार यांनी दिली आहे.

1982 साली निफाड तालुक्यातील रुई या गावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी कांदा परिषदेचे आयोजन केले होते त्यानंतर आता त्याच गावात ५ जून ला भव्य कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.नाशिक सह पुणे,आणि उत्तरमहाराष्ट्रातील जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणत घेतेले जाते,कांदा उत्पादक शेतकरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणत आहेत एवढेच नव्हे तर नाशिक जिल्यातील निफाड तालुक्यात लासलगाव हि आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ आहे .

असे असले तरी मागच्या अनेक वर्षांपासून कांदा उत्पदक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याची परस्थिती आहे.गेल्या १५ दिवसांपासून तरी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणत घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान ह्याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ह्या कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या कांदा परिषदेच्या माध्यमातून भाजप आणि रयत संघटना राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे तब्ब्ल ३९ वर्षानंतर होणाऱ्या या कांदा परिषदेकडे नाशिक जिल्या सह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे .