जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या २० च्या वर..

By चैतन्य गायकवाड |

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १७) सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या (Corona cases) संख्येत 20 च्यावर वाढ झाली आहे. शुक्रवारी २८ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यात 20 बाधित हे नाशिक महापालिका (NMC) क्षेत्रातील असून, नाशिक ग्रामीण भागातील ८, तर जिल्हाबाह्य शून्य बाधितांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) हद्दीतील एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. तर दिवसभरात जिल्ह्यात एकूण २२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) २४ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल २८ कोरोना बाधित आढळले. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ११८ कोरोनाबाधित उपचार घेत आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या ८८९९ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधितांची संख्या ४ लाख ७६ हजार ३३४ इतकी झाली आहे. त्यातील ४ लाख ६७ हजार ३१७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९८.११ टक्के इतके आहे.

देशात १३,०७९ नवे कोरोना बाधित… शुक्रवारी देशभरात देखील मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ०७९ नवीन कोरोना बाधित आढळले आहे. गुरुवारी (दि. १६ जून) देशात १२ हजार ८४७ नवे कोरोना बाधित आढळून आले होते. तर २४ तासांत २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील सक्रिय रुग्णांची (active patients) संख्या ६६ हजार ७०१ इतकी झाली आहे.

राज्यात ४,१६५ कोरोना रुग्ण… शुक्रवारी महाराष्ट्रात (Maharashtra) देखील जास्त प्रमाणात कोरोना बाधित आढळून आले. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार १६५ नवे कोरोना बाधित आढळले. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार ७४९ इतकी आहे. राज्यातील सकारात्मकता दर (Positivity rate) ९.३६ टक्के इतका आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशात केरळ (Keral) आणि दिल्ली (Delhi) येथे देखील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे १४.७८ टक्के सकारात्मकता दर आहे. तर गेल्या २४ तासांत केरळमध्ये ३ हजार १६२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर राजधानी दिल्लीत शुक्रवारी १७९७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ८४३ वर पोहोचली आहे.