मंत्रिमंडळ झालं पण ‘या’ निकालाकडे सर्वांच्या नजरा

तब्बल 39 दिवसानंतर आज शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला असून शिंदे गटाने भाजपच्या 18 मंत्र्यांना पहिल्या टप्प्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोपनीयतेची शपथ दिली. राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारावरून राज्यात अनेक आरोप प्रत्यारोप टीकास्त्र पाहायला मिळाले अखेर आज शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला टप्पा पार पडला मंत्र्यांचा शपथविधी झाला. असंअसलं तरी आता शिवसेना आणि शिंदे गटाच्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरन्यायाधीश एन व्ही रमणांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्य पिठापुढे प्राथमिक सुनावणी पूर्ण झाली असून या याचिका पाच किंवा अधिक सदस्यांच्या घटनापिठाकडे पाठवायचा की नाही यावर आता निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर आता शुक्रवार 12 ऑगस्टला सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड तसेच अन्य मुद्द्यांवर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाला आव्हान दिले आहे. शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची त्यांची मागणी असून शिंदे गटाकडून देखील विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस रद्द करण्याची विनंती केली आहे . सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने आता या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .