‘या’मुळे बांधली झाडाला राखी,आजच्या काळातील रक्षाबंधनाचा अर्थअभिप्रेत

सुरगाणा: भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सन म्हणजे रक्षाबंधन हा रक्षाबंधन सन वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. सुरगाणा शहरातील माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी झाडाप्रती असलेले आपले प्रेम दाखवत झाडाला राखी बांधली आहे. तालुक्यातील शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सराड येथे रक्षाबंधन निमित्ताने अनोखा उपक्रम राबवून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.


रक्षाबंधनाच्या दिवशी स्वरक्षणासाठी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे इतकाच पूर्वीच्याकाळी रक्षाबंधनाचा अर्थ अभिप्रेत होता. मात्र सर्व प्राणीमात्रांना मुबलक व मोफत प्राणवायूचा व इतर आयुर्वेदिक औषधांचा साठा वृक्ष-वल्ली आपणास उपलब्ध करून देतात व आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले खऱ्या अर्थाने रक्षण करतात, त्यामुळे वृक्ष-वल्ली हेच संपूर्ण मानव जातीचे रक्षक आहेत त्यामुळे वृक्ष-वल्लींचे आभार मानणे आपले कर्तव्य आहे .असे मानून शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सराड येथील विद्यार्थ्यांनी वृक्षांना रक्षाबंधन निमित्ताने राखी बांधून खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमा साजरी केली.


यावेळी शाळेचे अधिक्षक विकास राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रक्षाबंधनाच्या इतिहासचा उल्लेख केला व रक्षा बंधनासोबतच निसर्गाची काळजी घेणे ही काळाची गरज असल्याचे मनोगतात व्यक्त केले. या दिवशी शालेय आवारातील झाडांना राखी बांधून निसर्ग संवर्धनासाचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. इयत्ता १२ तील विद्यार्थी वंदना गायकवाड व दिनेश माडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या अधिक्षिका के.जे.गाढवे, या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुत्रसंचालन एस.डि. बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन जी.एस.चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.