Suicide Case: महाराष्ट्रात एका 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. असे बोलले जात आहे की एका नातेवाईकाने त्याला केस कापण्यासाठी नेले आणि त्याचे केस कापले ज्यामुळे तो अस्वस्थ होता.
आपले केस कापले गेल्याने संतापलेल्या १३ वर्षांच्या मुलाने महाराष्ट्रातील भाईंदर परिसरात एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याला नातेवाईकाने केस कापण्यासाठी नेले आणि त्याचे केस कापले. त्यामुळे विद्यार्थी नाराज झाला होता.
बाथरूमच्या खिडकीतून उडी मारली
पोलिसांनी सांगितले की, रात्री 11.30 च्या सुमारास त्याने 16व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीतून उडी मारली. त्याचा मृतदेह बिल्डिंग च्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. नवघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.