नाशिकरोडमधील नोट प्रेसच्या पार्किंगमध्ये बॉम्ब आणि मग सुटकेचा निःश्वास

नाशिक : देशाचे चलन छपाई करणाऱ्या अभेद्य सुरक्षा व्यवस्था असलेल्या नाशिकच्या नाशिकरोडमधील नोट प्रेसच्या पार्किंगमध्ये बॉम्ब आढळून आला आहे. कडेकोट सुरक्षा असणाऱ्या नोट प्रेस च्या पार्किंग मध्ये बॉम्ब आढळल्याने सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली होती.

पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराची नाकेबंदी करत बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने बॉम्ब निकामी केला. थोड्यावेळाने ही धावपळ सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी करण्यात आल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. नाशिकरोड येथील नोट प्रेस महत्त्वाचे ठिकाण असल्याने याठिकाणी सुरक्षा व्यवस्था प्रबळ असते. या नोट प्रेसमध्ये अलीकडील काळात तीन वेळा मॉकड्रिल करण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये सीआयएसएफ, गुप्तचर विभाग, शहर पोलिस तसेच वाहतूक विभागाचे मिळून शंभरहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराची नाकेबंदी करत बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने बॉम्ब निकामी केला…

पोलीस आणि औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराची नाकेबंदी करत बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने बॉम्ब निकामी केला. थोड्यावेळाने ही धावपळ सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी करण्यात आल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.