नाशिकमध्ये विवाहितेने दोन मुलांसह आत्महत्या करत संपवली जीवन यात्रा

नाशिक : सिन्नर (Sinner )तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेने आपल्या दोन मुलांसह एका तलावात उडी घेत आत्महत्या केली (A married woman who has been missing for two days has committed suicide by jumping into a lake with her two children) आहे. सिन्नर तालुक्यातील मोह येथे असलेल्या पाझर तलावात महिलेसह बारा वर्षीय मुलगी व नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. यानंतर या घटनेला वाचा फुटली. महिला व दोन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी सासरच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याच्या तक्रारीवरून पती सासू सह सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकमधील दुर्दैवी घटना ; दोन दिवसांपासून बेपत्ता नंतर तलावात सापडले मृतदेह

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील मोहगाव जवळील पाझर तलावामध्ये रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका महिलेस दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्याची माहिती पोलीस पाटील भाऊराव बिन्नर यांनी एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सुंदर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले त्यानंतर मृतदेहांबाबत पोलिसांकडून तपास सुरू असताना ज्योती विलास होलगीर ( वय 30 ) गौरी विलास होलगीर ( वय 12) आणि साई विलास होलगीर ( वय 9 ) तिघेही राहणार मोह, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हे बेपत्ता असल्याची तक्रार ज्योतीचा सासरा पांडुरंग कारभारी होलगीर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती . त्यावरून बेपत्ता असलेल्यांचेच हे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले .

सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार

मृत ज्योतीचा भाऊ सुनील चिंधु सदगीर (रा. नांदगाव, जिल्हा नाशिक) यांनी बारा वर्षांपासून सासरच्या लोकांकडून ज्योतिला माहेरून एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता ज्योतीने याकडे दुर्लक्ष केले मात्र मुलांच्या जन्मानंतरही सासरच्या लोकांकडून हा छळ सुरूच होता अखेर सासरच्यांकडून होणाऱ्या जासाला कंटाळून ज्योतीने मुलांसह आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सुनील सदगीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती विलास पांडुरंग होलगीर, सासरा पांडुरंग कारभारी होलगीर, सासू फसाबाई पांडुरंग होलगीर, दीर अमोल पांडुरंग होलगीर , जाऊ सुनिता अमोल होलगीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर सासरा आणि सासू यांना अटक करण्यात आली आहे.