शिंदे गटातील मंत्री म्हणाले, मला कुत्र निशाणी दिली तरी मी निवडून येईन

शिंदे गटाचे नेते नेहेमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. अश्याच एक मंत्र्याने पुन्हा एक वक्तव्य केले असून ते म्हणाले, मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. त्यांच्या ह्या वक्तव्यांनी सभेत हशा पिकला असून राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. हे मंत्री दुसरे तिसरे कोणी नसून शिंदे गट मंत्री अब्दुल सत्तार आहे. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हा साठी शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही लढत असून हे चिन्ह कोणाला मिळेल हा निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. त्यावरून सत्तारांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.


काय म्हणाले सत्तार

औरंगाबादेत आज हिंदु गर्व गर्जना यात्रेदरम्यान मेळावा घेण्यात आला. यावेळी सत्तार म्हणाले, मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. हा कमजोर कमकुवत माणसाला सपोर्ट लागतो. आपण कार्यकर्ता आहोत. कार्यकर्ता माणसाला कधीही भीती वाटत नाही. कार्यकर्ता पद कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. आमदारकी, मंत्रिपद जातं. पण कार्यकर्ता पद जात नाही. काम केलं तशी शक्ती मिळते. मग कितीही गतिरोधकं आले तर सरळ गाड्या मुंबईपर्यंत जातात. आणि एकदा जनतेनं स्वीकारलं नाही तर वखरावरही कुणी ठेवत नाही, असे वक्तव्य सत्तारांनी केल आहे.


भाजपा २ जागेंत समाधान मानणार नाही

पुढे सत्तार म्हणाले की, आपल्याला मेहनत करायची असून, पुढची जिल्हा परिषद निवडणूक समोर आहे. सोयगाव नगर पंचायत निवडणूक परवाच झाली असून, त्यामध्ये 17 नगरसेवक आमचे निवडून आले, तर दोन भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेत. आता पुढची युती कशी होईल यावर मला शंका आहे. दोन नगरसेवक दिलेत त्यामुळे त्यांचा समाधान होऊ शकत नाही आणि दोनच्या पुढे मी देऊच शकत नाही. नाहीतर जे आहे त्यांना अरबी समुद्राच्या जवळ येऊन ढकलून द्या.