एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है; हेमंत गोडसेंचा संजय राऊतांना इशारा!

एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है! आम्ही तर तसं पण शिवरायांचे मावळे आहोत. असे म्हणत शिंदे गट खासदार हेमंत गोडसे यांनी खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे. आज रविवारी (दि. १८)  शहारातील शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला यावेळी हेमंत गोडसे बोलत होते.

खा. गोडसे आणि खा. राऊत यांच्यातील शाब्दिक युध्द

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती आणि हेमंत गोडसे यांचं पुढच्या निवडणुकीत नक्कीच डिपॉझिट जप्त होणार असे चॅलेंज केले होते.

त्यानंतर हेमंत गोडसे यांनी लोगोलग पत्रकार परिषद घेत संजय राऊत राजीनामा देऊन आपल्यासमोर नाशिक लोकसभा मतदारसंघात उभे राहण्याचे खुले आव्हान दिले होते. मग कोण कोणाला पाडते हे दिसेल असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर पुन्हा संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी या आव्हानाला प्रत्युत्तर देत हेमंत गोडसे हे तर मच्छर त्यांना येथील पदाधिकाऱ्यांपैकी कोणीही पाडून दाखवेल आणि त्यांचे डिपॉझिट जप्त करेल असा पलटवार केला होता.

आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांनी संजय राऊत यांना डीवचण्याचा प्रयत्न केला असून आज ते म्हणत होते, संजय राऊत यांना माहीत नाही वाटतं, मच्छर चावल्यावर डेंग्यू होतो, प्लेटलेट कमी होतात, एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, आणि आम्ही तर तसं पण शिवरायांची मावळे आहोत. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. एक मच्छर काय करू शकतो तर आम्ही तर मावळे आहोत असे म्हणत संजय राऊत यांना थेट इशारा दिला आहे.


नाशिकमध्ये शिंदे गटाचा तट होतोय मजबूत

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का देत १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता शहरात संघटनात्मक पातळी वाढायला लागली आहे.  शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. आज नाशिकमध्ये शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला यावेळी शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नाशिक शहरातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक  सूर्यकांत लवटे , राजू लवटे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे  कार्याध्यक्ष किरण फडोळ, मनसे विद्यार्थी सेनेचे विराज बच्छाव,  अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्ना शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत.