बुलढाण्यात खासगी कंपनीच्या बसला अपघात.सात ते आठ प्रवासी जखमी

बुलढाणा:- जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर येथे खाजगी बसला अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. चालकाला झोप आल्याने बस झाडाला धडकली, आणि नंतर पलटली झाली. साई अमृत या खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी ७ वाजता हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटल्याने अपघात झाला.

अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी संभाजीनगर इथे नेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांपूर्वी नाशिक संभाजीनगर महामार्गावर चिंतामणी कंपनीच्या खासगी ट्रॅव्हल बस चा अपघात होऊन ३६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. राज्य सरकारकडून रात्रीचा प्रवास करू नका असे वारंवार आव्हान करूनही कोणीही पालन करत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज्यसरकारने एक वाहतूक नियमावली तयार करून वाहन चालकांनी त्याचे काटेकोर पालन केल्यास कुठेतरी अपघात कमी होतील.