नाशिकमध्ये परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला आग

नाशिक : नाशिकच्या उपनगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या एस बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे (ST bus caught fire in Nashik). या घटनेने प्रवाश्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातवरण पसरले होते. नाशिकहून प्रवाश्यांना घेऊन ही बस शिर्डीकडे जात होती. मात्र रस्त्यातच या बसला अचानक आग लागली.

उपनगर परिसरात ही बस पोहोचताच बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून तात्काळ प्रवाश्यांना खाली उतरून दिले. तर खबरदारी म्हणून यावेळी नाशिक-पुणे रोड वरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

बसचा चालक आणि वाहकाच्या तात्काळ बसला आग लागल्याची बाब लक्षात आल्याने त्यांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे नागरिकांनी एकच सुटकेचा निश्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार ही बस नाशिकहून प्रवाश्यांना घेऊन शिर्डीकडे जात होती. मात्र उपनगर परिसरात बस पोहोचताच रस्त्यात बसमधून धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब बस चालकाच्या लक्षात येताच त्याने बस थांबवली. सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ या ठिकाणी दाखल होत आग विझवली. या घटनेत बसचे नुकसान झालेले नाही आणि जीवितहानी देखील झाली नाहीये. मात्र आग का लागली याचे कारणही अद्याप स्पष्ट होऊ शकले नाहीये. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली आहे. बोलले जात आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात बसला आग लागणल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये महामंडळाच्या एस.टी बसचा देखील समावेश आहे. अनेक घटनांनी महाराष्ट्राला थरारून सोडलं होतं. तर काही वेळा बस चालकांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात दुर्घटना टळल्या. या घटनेत आगीचे स्वरूप मोठे नव्हते. मात्र तरी देखील बसचा प्रवास सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. अनेकदा अशान घटना घडल्यामुळे बसचा प्रवास नागरिकांना भीतीदायक आणि धोकादायक वाटत आहे.