आमदार बच्चू कडू यांचा अपघात;पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला जबर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याची देखील माहिती मिळत आहे. आज आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा अमरावती येथे अपघात झाला आहे. सुदैवाने ते बालबाल बचावले आहे.

सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली होती (MLA Bachu Kadu got into accident). यात त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्यांच्या बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचीही माहिती आहे.

बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अपघाताबद्दल माहीत होताच कार्यकर्त्यांची त्यांना उपचारार्थ दाखल केलेल्या खाजगी रुग्णालयाबाहेर बाहेर मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे प्रकृती स्थिर झाल्यानंतर स्वतः बच्चू कडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याची तसेच कोणीही भेटायला येऊ नये अशी विनंती केली आहे. तरी मात्र या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतच आहेत.

सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून चिंतेचं काही कारण नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुचाकीस्वाराने धडक दिल्याने बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला. या अपघातात बच्चू कडू यांना मुक्कामार लागल्याचं सांगितलं जातं. दरम्यान ही घटना कशी घडली, यामागे इतर काही कारण होते का याची चौकशी पोलीस करत आहेत.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या आधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. गोरे यांच्या कारला मध्यरात्री अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याही गाडीला अपघात झाला. आता बच्चू कडू यांचाही रस्ता ओलांडत असताना अपघात झाला आहे.

अभिनेता अभिजीत बिचुकले यांचा अपघात

काल रात्री बिग बॉस फेम आणि अभिनेता अभिजीत बिचुकले यांच्या देखील अपघाताची बातमी समोर आली होती. अभिजित बिचकुलेच्या वाहनाला मंगळवारी रात्री अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून त्याच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. ‘मी लवकरच काम सुरू करेन, काळजी करण्याचे काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.