सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात; काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती

सिन्नर : सिन्नर शिर्डी महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून, महामार्गावरील पाथरे गावाजवळ हॉटेल वनराई जवळ एका खाजगी आराम बसला आणि ट्रकचा भयंकर अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की या दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एस के 2751 आणि शिर्डी कडून सिन्नर कडे जाणारा ट्रक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक झाली. या खाजगी बस मध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी बस मधून शिर्डी कडे प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून, काही भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.