आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत गुलाबराव पाटलांचा पुन्हा हल्लाबोल..!

“आदित्य ठाकरे गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत” असं म्हणत गुलाबराव पाटलांनी (Water Supply Minister Gulabrao Patil) आदित्य ठाकरे (Adiyta Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. ‘हू इज आदित्य ठाकरे’, असं विचारत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं आहे. आदित्य ठाकरे गोधडीत पण नव्हते तेव्हापासून आम्ही शिवसेनेत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. आम्हाला गद्दार म्हणण्याचा आदित्य ठाकरेंना अधिकारच नसल्याचं पाटील म्हणाले. संजय राऊतांवरही (Sanjay Raut) यावेळी गुलाबराव पाटलांनी जोरदार टीका केली. संजय राऊत दुकान आवरा असं म्हणत चहापेक्षा किटली गरम अशी टीका राऊतांवर केली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील

” ३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत” –
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

बंडखोरी झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत (Shinde Group and Shiv Sena) मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद होत आहेत. दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात दुफळी निर्माण झाली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सोबतच हे दोन्ही गट एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहे ज्याच्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना विषय मिळत आहेत. अशात गुलाबराव पाटलांच्या या टीकेने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. ‘आदित्य ठाकरे गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत’, असा हल्लाबोल यावेळी गुलाबराव पाटलांनी केला आहे.

‘आमचा गब्बर आहे

आदित्य ठाकरेंसह गुलाबराव पाटलांनी विरोधकांनाही ऐकवलं. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र, “आमचा गब्बर आहे”, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

‘आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार

“मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे (Ali Baba Chalice Chor) तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल”, असंही पाटील यावेळी म्हणाले.