आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेची ऐशीतैशी; Z प्लस असताना देखील…

नेत्यांच्या सुरक्षेबाबत कमालीची काळजी घेतली जाते. सुरक्षेच्या कारणामुळे देशाने अनेक नेते गमावले असून अश्यात रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील सत्तांतरामुळे होत असलेली पडझड रोखण्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दौऱ्यादरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या गाड्या खासगी दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंन झेड प्लस सुरक्षा असताना ही तडजोड कोणी केली असा सवाल उठत आहे.

काय झाले नक्की?

आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दुपारी 12.40 च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. झेड सुरक्षा असताना खासगी गाड्या सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या. सुरक्षा रक्षक खासगी गाड्यातून आले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत तडजोड केली असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले..

“सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. माझ्यासाठी शिवसैनिक पुरेसे आहेत,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत दाखल झाल्यावर दिली. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरु होत. 

आदित्य ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा

आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पोलीस तसंच सुरक्षारक्षकांना पोलिसांची गाडी असणे अपेक्षित असताना त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या यापूर्वीच्या दौऱ्यात पोलिसांचा फौजफाटा होता, परंतु रत्नागिरी दौऱ्यात सुरक्षारक्षकांना खासगी गाड्या देऊन त्यावर पोलीस असे लेबल लावण्यात आले होते.

सूत्रांची माहिती

वरिष्ठांनी गाड्या मुंबईतच रोखल्या असल्याचे समोर आले. परवानगी मागितली होती. पण सुरक्षा रक्षकांच्या ज्या गाड्या असतात त्या नेण्यास परवानगी देण्यात आली नसल्याने. आदित्या ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक खासगी गाड्यातून आले.

आमदार राजन साळवी
“आदित्य ठाकरेंना सुरक्षा द्यायलाच पाहिजे. शिवसैनिक सुरक्षा द्यायला खंबीर आहे. राज्य सरकारची चूक आहेच. ठाकरे परिवाराला सुरक्षा देणं त्यांचं कर्तव्य आहे. भविष्यात सुरक्षा देतील हा विश्वास आहे. आता आम्ही समर्थ आहोत, आमचे शिवसैनिक आहेत, सुरक्षाव्यवस्था आहे. हे जाणूनबुजून केलं आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी दिली.

एकूणच याप्रकरणी राज्याचे राजकारणात चर्चांना उधान आले होते. आदित्य ठाकरेंनी रत्नागिरी मध्ये पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.