३० तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडे सुखावले मादी बिबट्याचा कुशीत..!

नाशिक : भरकटलेल्या बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घालून देण्यात अनेकदा वन विभागाला यश आले आहे. अशातच पुन्हा एकदा वनविभागाने माय लेकरांची भेट घडवून आणली आहे. सिन्नर तालुक्यातील मर्‍हळ (Sinner Taluka, Marhal) येथे ऊसाच्या शेतात दोन बछडे आढळून आले होते. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी माय-लेकरांची ताटातूट न होऊ देता मानव वन्यजीव संरक्षक विभाग आणि इको फाऊंडेशनच्या सहकार्यातून दोन्ही बछड्यांना मादीच्या कुशीत पोहचवले आहे.

अखेर ३० तासाच्या प्रतिक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत विसावले आहे. मर्‍हळ येथे पांगरी-मर्‍हळ शिव रस्त्यालगत प्रदीप एकनाथ आढाव, यांची शेतजमीनीत ऊसाची तोड सुरु असताना उसाच्या शेतात बिबट्याचे दोन ८ ते १० दिवसांचे नवजात बछडे आढळले होते. आढाव यांनी वनविभागाला माहिती दिली त्यानंतर वनविभागाने या दोन्ही बछड्यांना दूध पाजले व उसाच्या शेतात कॅरेट मध्ये ठेवले होते.

सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथे ३० तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडे सुखावले मादी बिबट्याचा कुशीत..पहा व्हिडीओ

बछड्यांना उसाच्या शेतात कॅरेट मध्ये ठेऊन ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. दरम्यान काही तासानंतर मादीने आपल्या बछड्यांना घेऊन जातानाच व्हिडीओ या कॅमेरात कैद झाला आहे. दोन्ही बछडे माईच्या कुशीत विसावल्याचे पाहून वनकर्मचारी खुशीत परतले.

बिबट्या या वन्य प्राण्याला लपण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा हे उसाचे शेत असते. आपल्या बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात वन विभागाला या घटनेत यश आले आहे. सिन्नर तालुक्यातील मर्‍हळ येथे एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन ८ ते १० दिवसांचे नवजात बछडे आढळले होते. त्यानंतर या बछड्यांना याच शेतात कॅरेट मध्ये ठेवण्यात आले. बिबट मादी आपल्या बछड्यांना शोधण्यासाठी या ठिकाणी नक्की येईल याची खात्री असल्याने तसेच त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाने ट्रॅप कॅमेरा लावला होता. अखेर ३० तासाच्या प्रतिक्षेनंतर आपल्या बछड्यांना शोधत आलेली मादी बिबट्या या कॅमेरात कैद झाली.

कॅमेरात मादी बिबट आपल्या बछड्यांच्या शोधात आलेली दिसत आहे. त्यानंतर तिने कॅरेट बाजूला करत आपल्या बिबट्यांना त्यातून बाहेर काढल्याच्या हालचाली देखील कैद झाल्या आहे. या सर्व घटनेचे चित्रण तेथे बसविण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात झाले असून दोन्ही बछडे माईच्या कुशीत विसावल्याचे पाहून वनकर्मचारी खुशीत परतले आहेत.