पुन्हा एक विनयभंग; नाशकात रस्तेही महिलांसाठी असुरक्षित ?

नाशिक : शहरात महिला रस्त्याने चालत असताना देखील सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. नाशिकमध्ये महिला रस्त्यावरून पायी जात असताना तिचा विनयभंग केल्याची घटना समोर येत आहे. संशयित अज्ञात दुचाकीस्वाराने महिला एकटी रस्त्याने पायी चालत असल्याचा फायदा घेत विनयभंग केला आहे. या प्रकरणी महिलेने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र शहरात वाढत असलेल्या या घटना अत्यंत संतापजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिला घरी पायी जात असताना संशयिताने मागून मोटार सायकल वरून येऊन फिर्यादीच्या जवळ आल्यानंतर अश्लीलपणे तिला स्पर्श केला आणि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून मुंबई नाका पोलीस ठाणे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. घरात काय आणि रस्त्यावर चालताना काय सर्रास पणे महिलांच्या सुरक्षिततेला तडा दिला जात आहे. विनयभंगाची कालच नाशिकमधून आलेली घटना अत्यंत खळबळजनक असताना आता पुन्हा एक घटना भर रस्त्यावर घडली आहे.

नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत समाज माध्यमांचा वापर करून एका मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली होती. पिडीत मुलीच्या वडिलांनी या संदर्भात तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांची पिडीत मुलगी तिच्या मोबाईलवर स्नॅपचॅट या समाज माध्यमाचा वापर करत होती. तिने स्नॅपचॅट चे अकाउंट ओपन केलेले होते. त्यावर ती स्वतःचे फोटो काढून टाकायची, तर कधी मित्र मैत्रिणींशी चॅटिंग देखील करायची. दरम्यान एकदा पीडित मुलीला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. तिने देखील कोणीतरी ओळखीचं किंवा शाळेतील मित्र मैत्रीण असावी म्हणून पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि ती सदर इसमासोबत चॅटिंग करू लागली. त्यानंतर एकदा या अनोळखी इसमाने पीडित मुलीस धमकी दिली.

धमकी दिल्यानंतर त्याने तिला तिला नग्न व्हिडिओ बनवण्याचे सांगितले. घाबरलेल्या मुलीने धमकीला भयभीत होऊन आरोपीचे म्हणणे ऐकले असता त्याला हे व्हिडीओ मिळाल्यावर तो ते व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला आणि संतापजनक म्हणजे या संशयित आरोपीने व्हिडिओ instagram च्या अकाउंट वर व्हायरल देखील केले. या प्रकरणी मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला असून व्हिडिओ स्नॅपचॅट वर आणि इंस्टाग्राम अकाउंट वर व्हायरल केल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.